spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

न्यू एनर्जी बहुउद्देशीय संस्थे च्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारोह संपन्न

नागपूर :- महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग अंतर्गत न्यु एनर्जी बहुउ‌द्देशिय संस्थेद्वारा नागार्जुन प्रगतशिल, सभागृह नागार्जुन बुध्द विहार नागपुर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या, जयंती समारोह नुकताच ३ जानेवारीला संपन्न झाला. समारोहात सुनिल मेसरे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नागपुर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विनोद शेडे व  साधना हटवार, न्यु एनर्जी बहुउद्देशिय संस्थेच्या सदस्या कल्याणी गोंडाणे, सामाजिक कार्यकर्ती नम्रता चौधरी, विशाखा विद्यालयाच्या मुख्याधापिका गोरघाटे ह्या प्रामुख्याने उपस्थित होते. समारोहाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सदस्या चंदा गोंडाणे होत्या. जयंती कार्यक्रमाच्या सुरवातीला अतिथीच्या हस्ते दिपप्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सुनिल मेसरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर मार्गदर्शन करून उपस्थित विद्यार्थाना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेचे विचार अंगिकृत करण्याचे आवाहन केले. प्रसंगी जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या साधना हटवार यांनी उपस्थित विद्यार्थाना बाल विवाह होणार नाही याची शपथ देवुन बालकांचे हक्क याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपस्थित सामाजिक कार्यकर्ती नम्रता चौधरी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवनाविषयक माहिती देवुन सावित्रीबाई फुलेवर सुंदर कविता प्रस्तुत केल्यात. जयंती समारोहाला उपस्थित असलेले जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विनोद शेंडे यांनी गीताद्वारे सावित्रीबाई फुले च्या जिवनावर माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सदस्या चंदा गोंडाणे यांनी अध्यक्षिय मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग अंतर्गत न्यु एनर्जी बहुउ‌द्देशिय संस्थेद्वारा संचालित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतील वर्ष 2024-25 या वर्षात 10 वी 12 व्या वर्गात प्रथम श्रेणीत पास होणाऱ्या गुणवंत विद्यार्थाना शालेय साहित्य व प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात आला. महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल सुनिल मेसर ,विनोद शेंडे, साधना हटवार व नम्रता चौधरी यांचा न्यु एनर्जी बहुउद्देशिय संस्थे च्यावतीने शॉल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.

पाहुण्याचे स्वागत किशोरी ईटनकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पुजा झओडे यांनी तर आभार सुभाष यांनी मानले. जयंती समारोहाला विशाखा विद्यालयाच्या 40 विद्यार्थीनी व बालसंगोपन योजनेचे 50 लाभार्थी यांच्यासह 70 महिला उपस्थित होत्या. जयंती समारोह यशस्वीरीत्या सर्वश्री रितेश करणासे, नैना तामगाडगे, समिक्षा मेश्राम, जयमाला गायकवाड, निलिमा आवळे, सुषमा धनविजय, इंदु ठाकरे यांनी अथक परिश्रम घेतले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.