spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शहरातील महाविद्यालयांमध्ये होणार मतदान जनजागृती

– युवा वर्गाने सक्रिय सहभाग घ्यावा – आयुक्त अकुनुरी नरेश यांचे आवाहन

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. येत्या १२ जानेवारी – राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून, प्रत्येक महाविद्यालयातील युवावर्गाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदान जनजागृती कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयुक्त अकुनुरी नरेश यांनी केले.

दि. ०६ जानेवारी रोजी चंद्रपूर महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शहरातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, लोकशाही अधिक बळकट करण्यामध्ये युवावर्गाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, युवकांनी स्वतः मतदान करावे तसेच इतर नागरिकांनाही मतदानासाठी प्रेरित करावे.

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त महाविद्यालयांमध्ये रॅली, घोषवाक्य स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, मतदार शपथ, पथनाट्य, संवाद सत्रे आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. या उपक्रमांमुळे प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये जागरूकता वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

या बैठकीस विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक तसेच महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. सर्व महाविद्यालयांनी प्रशासनाला सहकार्य करून मतदान जनजागृती अभियान यशस्वी करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.