spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नवनिर्वाचित अध्यक्ष पियूष बुरडे यांचा पदग्रहण समारंभ, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, स्मार्ट सिटी बनविण्यासाठी सर्व सदस्यांचे सहकार्य अपेक्षित

खापा :- खापा नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पियुष राजेंद्र बुरडे यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. हा पदग्रहण सोहळा सावनेरच आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवार, ६ जानेवारीला खापा नगरपरिषदेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. खापा शहराच्या विकासाची धुरा आता अधिकृतपणे नवनिर्वाचित मंडळाच्या हाती सोपवण्यात आली आहे.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष पियूष बुरडे यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. तसेच सर्व नगरसेवकांनी भारतीय संविधान प्रस्ताविकाचे सामूहिक वाचन केले. शपथविधीनंतर आमदार देशमुख यांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना शुभेच्छा देत, खापा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण तसेच नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही”

नवनिर्वाचित अध्यक्ष बुरडे यांनी आपल्या भाषणात नागरिकांनी दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी पारदर्शक, लोकाभिमुख विकासाभिमुख प्रशासन देण्याचा संकल्प व्यक्त केला. खापा शहराचा सर्वांगीण विकास व शहराला स्मार्ट सिटीच्या दिशेने नेण्यासाठी सर्व सदस्यांची साथ अत्यंत आवश्यक आहे. सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास खापा शहराला स्मार्ट सिटी बनवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्ष पियुष बुरडे यांनी केले. यावेळी त्यांनी नगरपरिषदेची सध्याची आर्थिक स्थिती अतिशय कमजोर असल्याचे नमूद करून, पालकमंत्री व आमदार यांच्या सहकार्याने खापा शहरासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. खापाकरांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“अतिशय चुरशीच्या विजयानंतर भव्य सोहळा”

२१ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार, खापा येथील मतदारांनी युवा नेतृत्वावर प्रचंड विश्वास दर्शवत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पियूष बुरडे यांच्यासह ९ नगरसेवकांना निवडून दिले. या विजयाचे औचित्य साधून नगर परिषद खापा प्रांगणात आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली भव्य पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष पियूष बुरडे आणि निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार डॉ. आशिष देशमुख, मुख्याधिकारी आकाश सुरडकर, डॉ. राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, अशोक धोटे, देविदास मदनकर, अशोक तांदुळकर, प्रकाश टेकाडे, किशोर मुसळे, विजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरपरिषद सदस्य सुनील पाहुणे, निखिल आष्टणकर, रोशनी डेरे, रवी परतेकी, प्रशांत तुमाने, शोभा कारणकर, अंजली मेनकुदळे, किशोर आष्टणकर, निशा कठौते, वैशाली लिखार यांच्यासह दीपक राय, डॉ. प्रभाकर बोंदरे, राजेशचंद्र बुरडे, श्रीकांत चांदपुरकर, जयंत लांजेवार, आशिष निस्ताने, पुरुषोत्तम नागपुरकर यांच्यासह सर्व पक्षाचे नेते मंडळी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रकल्प अधिकारी प्रमोद लकडकर व तर उपस्थित मान्यवरांचे आभार कर अधिकारी ज्ञानेश्वर सोनवाणे यांनी केले.

Popular Articles