spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

…..अखेर चाचेर आयुर्वेदिक दवाखाना मध्ये पूर्ण वेळ डॉक्टर झाले उपलब्ध

– ग्रामपंचायत सदस्य व काँग्रेसचे भावी जि प चे उमेदवार शैलेश कोपरकर यांच्या सतत पाठपुराव्याला यश

किशोर साहू, मौदा ता. ८:- आयुर्वेदिक दवाखाना चाचेर येथे डॉ. मानसी गहूकार यांची पूर्ण वेळ निवासी डॉक्टर म्हणून तर सामुदायिक अधिकारी म्हणून डॉ. तक्षशीला मेश्राम यांची नियुक्ती झाली. याबाबत ग्रा प चाचेर ने खासदार श्यामकुमार बर्वे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदन व ठरावाद्वारे मागणी केलेली होती. याबाबत सतत पाठपुरावा ग्रामपंचायत सदस्य व काँग्रेसचे भावी जि प चे उमेदवार शैलेश कोपरकर यांनी खासदार श्यामकुमार बर्वे यांच्याकडे केलेला होता,असे त्यांनी सांगितले.

या पाठपुराव्याला यश येऊन अखेर आज बुधवार (दि. 7 जानेवारी) ला आयुर्वेदिक दवाखान्यात दोन्ही डॉक्टरांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने खासदार श्यामकुमार बर्वे यांचे आभार मानले असून ,त्या प्रीतर्थ रुजू झालेल्या दोन्ही डॉक्टरांचे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सरपंचा लुम्बिनी महेश कलारे,उपसरपंच रवींद्र ठाकरे, ग्रा प सदस्य सुरेंद्र टेंभरे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर नाकाडे, चुडामन हुमणे, गुलाब बावनकुळे, विनोद लांडगे, बाळूमामा, अंगणवाडी सेविका ,मदतनीस व आशा वर्कर उपस्थित होते.

Popular Articles