spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर गार्डन क्लबतर्फे १२३ वे वार्षिक फुलांचे प्रदर्शन ११ जानेवारीला

नागपूर :- गार्डन क्लबतर्फे १२३ वे वार्षिक फुलांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन (रविवारी ) दिनांक ११ जानेवारी रोजी कुसुमताई वानखेडे हॉल, नॉर्थ अंबाझरी रोड, नागपूर येथे सकाळी ११ वाजता. होणार आहे. या प्रदर्शनात निसर्गसौंदर्याची नेत्रदीपक मांडणी पाहायला मिळेल. गुलाब, ग्लॅडिओलाय, फुलांची सजावट, इनडोअर रोपे, कॅक्टस व सुक्युलंट्स, बोन्साय रोपे इत्यादींचा यात समावेश असेल. प्रदर्शन सकाळी ११.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत असेल. अशी माहिती पत्रपरिषदेमध्ये दिली. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि बागकामा विषयी प्रेम आणि कुतूहल जागृत करणे हा आहे. या उपक्रमांत फुलांची रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सर्व निसर्गप्रेमी, बागकाम प्रेमी आणि विद्यार्थ्यांनी या फुलांच्या सोहळ्यात सहभागी व्हावे आणि त्याचा आनंद लुटावा, अशी विनंती केली आहे. पत्रपरिषदेला अध्यक्षा अनुजा परचुरे, उपाध्यक्ष डॉ.राजश्री बापट आणि जॉईंट सेक्रेटरी रेखा देशमुख यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला 11 जानेवारी रोजी, सकाळी 11 वाजता. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या आस्था कार्लेकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन होईल. असे पत्रकार परिषदेमध्ये अनुजा परचुरे यांनी सांगितले.

Popular Articles