spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सिटू तर्फे ‘आशा दिवस उत्सव’ मोठ्या थाटात संपन्न

नागपूर :- आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सिआयटीयू) नागपूर जिल्हा तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही आशा दिवस उत्सव मोठ्या थाटामाटात सेवाश्रम येथे नुकताच संपन्न झाला. वर्षभर आशा वर्कर मोबदला मिळून सुद्धा नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सेवा देण्याकरता तत्पर असतात. हिंदीमध्ये असलेले कलागुण सेवा देण्याच्या जिम्मेदारीतून नाहीसे झालेले दिसतात. अशा परिस्थितीमध्ये आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सिआयटीयू ) करमणुकीचा भाग व त्या महिलांमध्ये असलेले विविध प्रकारचे कलागुण प्रदर्शित करण्याची त्यांची इच्छा पूर्ण करून देण्याचे काम सिटू तर्फे एका मोठ्या मंचावर केले जाते. त्यामधून त्या प्रत्येक महिलेला समाधान मिळते. संघटनेच्या चांगले कलाकार निर्माण करणे हा वार्षिक स्नेहसंमेलन करून त्यामधून मनमोहक डांस, नाटक व गायनसह उत्कृष्ट भोजन व्यवस्था करून संपन्न केले जाते. संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष कॉ. राजेंद्र साठे यांच्या प्रेरणेतून जिल्हा महासचिव कॉ. प्रीती मेश्राम यांच्या अथक परिश्रमातून रंजना पौनीकर, लक्षमी कोट्टेजवार, सरिता थोटे, मंदा गंधारे यांच्या सहयोगातून संपन्न झाला.

Popular Articles