spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पोरवाल महाविद्यालयात सेठ नेमकुमारजी पोरवाल जयंती अर्थात संस्थापक दिवस सोहळा संपन्न

कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयात बुधवार, ७ जानेवारी २०२६ रोजी दिवंगत सेठ नेमकुमारजी पोरवाल यांचा जन्मदिवस संस्थापक दिन म्हणून साजरा करण्यात आला. सेठ नेमकुमारजी पोरवाल यांच्या तैलचित्राला मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय अग्रवाल अध्यक्ष, कामठी नगरपरिषद, प्रमुख पाहुणे  प्रा. डॉ. मनोहर कुंभारे, संचालक, वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था, नागपूर, राजकिरण बर्वे, अध्यक्ष नगरपंचायत येरखेडा, दि शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अखिल पोरवाल, कोषाध्यक्ष अभिमन्यु पोरवाल, सचिव विजयकुमार शर्मा, सीईओ प्रा. डॉ . सुधाकर धोंडगे, प्राचार्य प्रा. डॉ. स्वप्नील दाहात, कार्यक्रम समन्वयक व उपप्राचार्य प्रा. डॉ. मनीष चक्रवर्ती या मान्यवरांच्याहस्ते पुष्पांजली अर्पण करू विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रास्तविकात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. स्वप्नील दाहात यांनी महाविद्यालयच्या ६० वर्ष आढावा सांगतांना महाविद्यालय स्थापनेचा हिरक जयंती महोत्सव साजरा करत असून नेमकूमाराजीने लावलेल्या औदुंबर वृक्षाचे फळ सतत मिळत असून देश, विदेशात व समाजात महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध उच्च पदे भूषवित आहेत अशी माहिती दिली. डॉ. एस. एस. धोंडगे (सीईओ) यांनी सांगितले की, साठ वर्षाच्या प्रवासात महाविद्यालयांने विविध शिबिरे, चर्चासत्रे, कार्यशाळा, परिषद, आयोजित करून विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरित केलेले आहे. महाविद्यालयाच्या ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल स्वर्णजयंती महोत्सवाप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते हा मोठा अविस्मरणीय प्रसंग होता.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रो. डॉ.मनोहर कुंभारे यांनी म्हटले की, कामठी सारख्या ग्रामीण भागामध्ये तळागाळातील लोकांसाठी ज्ञानाची परंपरा वृद्धिंगत व्हावी यासाठी नेमकुमारजी पोरवाल यांनी सेठ केसरीमल पोरवाल हे महाविद्यालय निर्माण केले असून आज नागपुर जिल्यातील नव्हे तर मध्य भारतातील एक नामवंत महाविद्यालय म्हणून ते प्रसिद्ध झाले आहे. हिच ज्ञान परंपरा पोरवाल परिवाराने सुरु ठेवून नैतिक मूल्याने सज्ज असे सुजाण नागरिक निर्माण करावेत असे मत मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय अग्रवाल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून म्हटले की, कामठीत लोकांना रोजगार मिळावा यासाठी पोरवाल परिवाराने कारखाने निर्माण केले तर दुसरीकडे दि शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून पोरवाल महाविद्यालयाच्या रुपात सर्वांसाठी शिक्षणाची दारे उघडलीत. ही कामठी शहरासाठी गौरवाची गोष्ट आहे. संस्थेच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे त्यांनी जाहीर केले.

याप्रसंगी अफिफा शाफिया हिला वरिष्ठ महाविद्यालयातील उत्कृष्ट विद्यार्थी तर कनिष्ठ महाविद्यालयातून कुमारी राधा अग्रवाल हिला उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सुवर्णपदक देण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमात परिसरातील गणमान्य व्यक्ति, महाविद्यालयचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. रेणू तिवारी, आय.क्यू.ए. समन्वयक डॉ. प्रशांत धोंगळे, प्रा. डॉ. इफ्तेखार हुसैन, डॉ. तारुण्य मुलतानी, डॉ. जितेंद्र सावजी तागडे, लेफ्टनंट मोहमम्द असरार, डॉ. रश्मी जाचक, डॉ. आशा रामटेके, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर अग्रवाल, पर्यवेक्षक प्रा. विश्वनाथ वंजारी, रजिस्ट्रार स्वप्नील राठोड, किशोर गबड, प्रवीण अंबादे, मंगेश यादव इत्यादींनी कठीण परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गिजाला हाश्मी तर आभार कार्यक्रम समन्वयक प्रो. डॉ. मनिष चक्रवर्ती यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.