spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाप्रज्ञा बौद्ध विहार तिरोडा ला वाढ दिवसा प्रीतर्थ धम्म दान

तिरोडा :- येथील महाप्रज्ञा बौद्ध विहार, रेल्वे चौकी तिरोडा येथे महाप्रज्ञा बौद्ध विहार समिती, तिरोडा ला स्मृतीशेष प्रणाली राजाभाऊ डहाटे यांच्या वाढ दिवसा प्रीतर्थ डॉ. निशांत राजाभाऊ डहाटे आणि परिवार, बेलाटी खुर्द तिरोडा यांच्या वतीने महाप्रज्ञा बौद्ध विहार समिती, पदाधिकारी यांना 5000/- धम्म राशी धम्म दान करण्यात आली.

या प्रसंगी कार्यक्रमाला महाप्रज्ञा बौद्ध विहार समितीचे उपाध्यक्ष महेंद्र बडगे, सचिव प्रवीण चव्हाण, सहसचिव महेंद्र वालदे, कोषाध्यक्ष संजय जांभुळकर, संघटक पवन वासनिक, मार्गदर्शक सुरेश बन्सोड, के.के. वैद्य, मनिंद्र बन्सोड, कार्यकारणी सदस्य पवन वाघमारे, राहुल बडगे, लंकेश टेंभेकर, प्रवीण नंदागवळी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महाप्रज्ञा बुद्ध विहार येथे डहाटे परिवारा तर्फे तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामूहिक बुद्ध वंदना करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाला सर्व उपस्थितांचे व दानदाते डहाटे परिवाराचे आभार कोषाध्यक्ष संजय जांभूळकर यांनी मानले…

Popular Articles