spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रविवार ११ जानेवारी ला कन्हान येथे महारक्तदान शिबीर

कन्हान :- जीवनदान महाकुंभ – २०२६ अंतर्गत महा रक्तदान शिबीराचे रामानंदाचार्य संप्रदाय कन्हान सेवा केंद्रा व्दारे रविवार (दि.११) जाने. ला डोणेकर सभागृह कन्हान येथे आयोजन करण्यात आले आहे.

रक्ताच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण गमवावे लागतात. ही गरज लक्षात घेऊन समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी तसेच गरजु रुग्णांना मोफत वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या उदात्त हेतुने रामानंदा चार्य संप्रदाय कन्हान सेवा केंद्र व्दारे जीवनदान महाकुंभ-२०२६ अंतर्गत महारक्तदान शिबिराचे डोणेकर सभागृह जे एन रोड कन्हान येथे रविवार (दि.११) जानेवारी २०२६ ला सकाळी ८ ते सायं. ६ वाजे पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. ” तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा ! ” या प्रेरणादायी संदेशात नागरिकांना रक्तदानासाठी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या महारक्तदान शिबीरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सुरक्षित पद्धतीने रक्तसंकलन करण्यात येणार असून सर्व वैद्यकिय सेवा उपलब्ध असतील. कन्हान शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी व युवकांनी तसेच सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सह भाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य रामानंदाचार्य दक्षिणपीठ नानिजधाम (महाराष्ट्र) यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविला जात असुन मानवी सेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातुन करण्यात येत आहे.

Popular Articles