नागपूर :- माजी सैनिक बहुउद्देशीय सेवा संस्था नागपूर आणि प्रज्ञा वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 12 ते 22 फरवरी या दरम्यान नागपूर महाकुंभाचे करण्यात आले आहे. या महाकुंभात नागपुरातील जनतेने 12 फेब्रुवारी रोजी महाकुंभ मेळाव्या चा उद्देश म्हणजे अकरा संकल्प, ११ दिवस उपक्रम, यावर महाकुंभामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश वर्ल्ड रेकॉर्ड गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड करण्यासाठी आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी प्रयत्नशील राहतील. यासाठी जनतेला या कार्यक्रमात लाखोंच्या संख्येने उपस्थितीत रहावे. नागपूर 2026 च्या महाकुंभ मेळाव्यात अकरा दिवसात नागपूर शहरांच्या नागरिकांसमोर मांडण्याचा संकल्प केला आहे तो असा, नागपूर हेरिटेज मॅरेथॉन, वाकथन आणि सायक्लोथॉन, सामूहिक योगा आणि झुंबा सत्र, मिशन ग्रीन नागपूर, मिशन हेल्दी नागपूर, नागपुर हिरोज ॲवॉर्ड, महिला व बाल सुरक्षा प्रशिक्षणाचे विशेष वर्ग, स्वदेशी कौशल्य उद्योजकता दालन, महापुस्तक दान उपक्रम, जीवन रक्षक आरोग्य आपत्कालीन मार्गदर्शन, फॅमिली गेम्स कार्निव्हल लुप्त होणारे खेळ -यासंदर्भात उपक्रम, भारतीय संस्कृती आणि आधुनिक विकास प्रदर्शनीचे आयोजन 12 ते 22 फेब्रुवारी 2026 दरम्यान नागपुरात लवकरच आयोजित करण्यात येईल. सर्व नागरिकांनी या महाकुंभ मेळाव्याचा लाभ घ्यावा. व जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन अविनाश बोरकर यांनी केलेले आहे. विसरू नका मित्रांनो या महाकुंभाचा लाभ घ्यावा. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे अविनाश बोरकर यांनी कळविले आहे.








