– नगराध्यक्षाने बहुमताने सत्ता दिल्याबद्दल नागरिकांचे आभार व्यक्त करून अभिनंदन केले
कन्हान :- केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी, राज्याचे मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्व तसेच नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाध्यक्ष आंनदराव राऊत सह भाजप वरिष्ट पदाधिकारी आदिंच्या खंबीर नेतुत्वात कन्हान शहराचा विकास करण्यास स्वच्छ पाणी पुरवठा, बाजाराची स्थायी जागा, बस स्टाप व सुंदर स्मशान घाट आदी सह प्रसिद्ध केलेल्या जाहीर नामाला समोर ठेवुनच विकास कामाला सुरुवात करणार असुन पुढील पाच वर्षात शहराचा कायापालट करून नक्कीच दाखवु असा ठाम विश्वास व्यक्त करित म्हटले की, आम्ही प्रयत्नशील आहोत आणि हे करण्यासाठी मला सर्व नगरसेवकांचे पाठबळ देखिल मिळेल असा विश्वास व्यकत करित नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे हयानी अत्यंत उत्साही वातावरणात नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने कन्हान नगरपरिषदेचा पदभार ग्रहण केला. 

भाजपा रामटेक जिल्हा अध्यक्ष आंनदराव राऊत, कन्हान निवडणुक निरिक्षक माजी आमदार सुधाकर कोहळे, उपाध्यक्ष उदयसिंह (गज्जु) यादव सोबत भार तीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र शेंदरे यांच्या नेतृत्वावर कन्हान शहरवासीयानी पुर्ण विश्वास टाकत नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे सह १४ नगरसे वक निवडुन देत एकहाती कन्हान नगरपरिषदेची बहु मताने सत्ता सोपवली आहे. २१ डिसेंबर ला निकाल लागल्या नंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवकासह समस्त नगरवासीयांचे लक्ष पदग्रहण समारंभाकडे वेधले होते. ती उत्सुकता गुरूवार (दि.८) जानेवारी २०२६ रोजी राज्यस्तरीय सदस्य डॉ. राजीव पोतदार, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आंनदराव राऊत, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, जिल्हा उपाध्यक्ष उदयसिंह यादव, सुनंदा दिवटे, जिल्हा महामंत्री अनिल निधान, अवि नाश खडतकर, राहुल किरपान, गजानन आसोले, मा जी जि प गटनेते व्यकट कारेमोरे, कन्हान मंडळ अध्यक्ष बिरेंद्र सिंह, कन्हान अध्यक्ष महेंद्र साबरे, माजी जि प उपाध्यक्ष शरद डोणेकर आदी मान्यवरांच्या उपस्थि तीत नगरपरिषद कन्हान-पिपरी नगराध्यक्ष पदी राजेंद्र शेंदरे यांना मुख्याधिकारी दिपक घोडके यानी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करित गोड पेडा चारून पदग्रहण सोहळा थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलकंठ मस्के यांनी तर नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यानी भाजपा पदाधिकारी सर्व नगरसेवक व उपस्थित मान्यवर, पत्रकार आणि शहरवासीयांचे मनपुर्व क आभार मानले. पदग्रहण सोहळयास मोठया संख्ये ने शहरातील महिला, पुरूषांचा जनसमुह उपस्थित होता.








