spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पांढरकवडा येथे पोलीस रेझिंग-डे निमित्त हेल्मेट वाटप

– नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्टचा अनोखा उपक्रम 

पांढरकवडा :- महाराष्ट्र पोलिस दलाची स्थापना २ जानेवारी १९६१ साली करण्यात आली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान केला. या दिवसापासून २ जानेवारी हा पोलिस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ८ जानेवारी रोजी रस्ता सुरक्षा सप्ताह व पोलीस रेझिंग -डे” अनुषंगाने पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्ट यांच्या तर्फे वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपक्रम राबाविण्यात आला. सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे तसेच NHIT चे प्रोजेक्ट हेड अमित कुमार राणा यांच्या उपस्थितीत नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्ट मार्फत ३६ हेल्मेटचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बंसल यांच्या हस्ते हेल्मेट वितरण करण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत, रस्ते अपघात रोखण्यासाठी हेल्मेटचा वापर अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेरखित केले. यावेळी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की दुचाकी चालविताना हेल्मेटचा नियमित वापर करावा, वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातमुक्त व सुरक्षित तालुका घडू शकते, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सदर कार्यक्रमात हेल्मेट, रोड सुरक्षा मार्गदर्शन लिफ्लेट, पंफ्लेट, आपत्कालीन नंबर कॉर्ड वाटप करून रोड सुरक्षेवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पेंढारकर यांनी केले.

Popular Articles