दुचाकीच्या धडकेत ५२ वर्षीय सायकलस्वारचा मृत्यु

0
45

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर महामार्गवर वराडा एम.एच.के.एस पेट्रोल पंप जवळ दुचाकी वाहनाच्या धडकेत ५२ वर्षीय सायकलस्वारा चा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे .

सोमवार (दि.१२) जानेवारी ला धनराज श्याम लाल तांडेकर वय ४५ वर्ष रा. वाघोली हा गुप्ता कोल वाशरी येथे ड्युटीवर हजर होता. सकाळी ८ वाजता दरम्यान त्याला मित्र कुंदन ठाकरे रा. येसंबा (नांदगाव) याचा फोन आला व त्यांने सांगितले की तुझा भाऊ श्रीराम तांडेकर याचा अपघात एम.एच.के.एस पेट्रोल पंप वराडा नागपुर -जबलपुर महामार्गावर जवळ झाला आहे. धनराज तांडेकर आपल्या मित्र दिवाकर कोलबा पौनिकर सोबत दुचाकी वाहनाने घटनास्थळी गेले असता लोकांची गर्दी जमलेली होती. धनराजने जवळ जावुन पाहिले असता त्याचा डोक्यावर, चेहरा वर व छातीवर मार लागला असुन नाकातुन व तोंडा तुन रक्त निघत होते व भावाची सायकल ही दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४० सी ४१७४ मध्ये फसली असुन तुटलेली अवस्थेत दिसुन आली. घटनेची माहि ती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले आणि जख्मी इसमाला उपचारकामी कामठी उपजि ल्हा रूग्णालय येथे नेले असता तेथील डाॅक्टरांनी तपासुन त्याला मृत घोषित केले.

मृतक श्रीराम श्यामलाल तांडेकर वय ५२ वर्ष हा सकाळी ८ वाजता दरम्यान एमएचकेएस पेट्रोल पंप नागपुर जबलपुर महामार्ग पार करित असतांना दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४० सी ४१७४ च्या चालकाने कन्हान मार्ग मनसर कडे जात असतांना आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजी पणाने चालवुन सायकलस्वार ला जोरदार धडक मारली. या अपघातात त्याचा मृत्यु झाला. या प्रकरणी कन्हान पोलीसांनी धनराज तांडेकर यांचा तक्रारीवरून दुचाकी वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाख ल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.