spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रोटी फाऊंडेशनच्या सदस्यांची समर्थ प्रा. शाळेला भेट

– गरजु विद्यार्थ्यांना श्युज व जॉमेट्री बॉक्स चे केले वाटप

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- इतरांना मदत करावी असा बराचशा लोकांचा विचार असतो मात्र त्यापैकी फार कमी लोकं हा त्यांचा विचार प्रत्यक्षात प्रक्रीयेद्वारे उतरवुन दाखवितात. याला अपवाद म्हणून मुंबई येथील ‘ रोटी फाऊंडेशन ‘ ही सेवाभावि संस्था ठरलेली आहे. ही संस्था नेहमीच तालुक्यातील प्रख्यात समर्थ शाळेतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत असते. फाऊंडेशनचे समन्वयक सी एम बगेरिया, संजय सरकार व संजय पन्नासे यांनी रामटेक येथील समर्थ शाळेला पुन्हा एकदा भेट देत येथील इयत्ता ६ व ७ च्या गरजु विद्यार्थ्यांना श्यूज आणि जॉमेट्री बॉक्सचे वाटप करून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. शालेय उपयोगी वस्तु जाणून घेत त्याची नोंद करीत त्या लवकरच पुरवठा करण्याची हमी दिली. बरेच लोक म्हणतात की त्यांना मदत करायची आहे; प्रत्यक्षात ते करण्यासाठी “रोटी फाउंडेशन मुंबईने “पाऊल उचलले आहे आणि आजच्या भौतिकवादी आणि स्वार्थी युगात समर्थ शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी या फाउंडेशनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. रोटी फाउंडेशन मुंबईच्या वतीने समर्थ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, कंपास बॉक्स, क्रीडा साहित वितरित करण्यात येत असतात. रोटी फाउंडेशनचे संस्थापक पोलीस महासंचालक डी शिवानंद यांच्या माध्यमातून हे साहित्य वाटप करण्यात आले. दरम्यान रोटी फाउंडेशन ने शाळेच्या पहिल्या दिवसापासून तर संपूर्ण सत्रात समर्थ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत खाद्य सामग्री व क्रीडा साहित्य पुरविले असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका कविता जंजाळ यांनी माहिती देताना यावेळी सांगितले. याप्रसंगी समर्थ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंद, माध्यमिक शाळेचे शिक्षक यांचेसह व्हाईस ऑफ मिडीया पत्रकार संघटनेच्या रामटेक शाखेचे अध्यक्ष राजु कापसे, सचिव पंकज बावनकर, प्रसिद्धी प्रमुख सचिन चौरसिया तथा सदस्य सुरेंद्र बिरणवार उपस्थित होते. रोटी फाउंडेशनच्या या सेवाभावी कामाबद्दल व्यवस्थापनातर्फे संस्थेचे आभार मानले.

निस्वार्थ सेवेचे पाऊल

रोटी फाउंडेशन ने निस्वार्थ सेवेचे हे पाऊल उचलले आहे. फाउंडेशन चा प्रमुख उद्देश, गरजूंना पौष्टिक जेवण, न्यूट्रिशन, मल्टीविटामिन, तथा क्रिडा साहित्य देऊन विविध उपक्रमांद्वारे भारत देशामधून कुपोषण दूर करणे आणि विद्यार्थ्यांना निरोगी ठेवणे, आरोग्यदायी जीवन देणे यावर लक्ष केंद्रित करणे असा आहे. ते शिक्षण, आरोग्य आणि महिला सुरक्षा यांसारख्या क्षेत्रातही काम करतात. सर्वांचा सर्वांगीण विकास करावा या दृष्टिकोनातून रोटी फाउंडेशन कार्यरत असते. ROTI, म्हणजे रिटर्न ऑफ टाईमली इन्व्हेस्टमेंट, जे धोरणात्मक गुंतवणूक नियोजनाच्या महत्त्वाविषयी जागरूकता पसरवण्याच्या कार्याला, त्यांच्या समर्पणाला मूर्त रूप देते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.