– जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ; ४४ तक्रार निवेदन प्राप्त
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- तालुक्यातील मुख्यालय येथे तालुकास्तरीय विविध शासकीय योजनेच्या आढावा व जनसंवाद कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार (दी.१०) डिसेंबरला उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आढावा घेत प्राप्त तक्रारीची तात्काळ नोंद घेऊन नियमानुसार व ठराविक कालमर्यादेत कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. कार्यक्रमात तहसीलदार रमेश कोळपे, गटविकास अधिकारी जयसिंग जाधव यांच्यासह भूमि अभिलेख विभाग, जिल्हा परिषद विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कृषी विभाग, महावितरण, बँक प्रतिनिधी तसेच इतर संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तालुक्याची सर्वसाधारण माहिती सादर करण्यात आली तालुक्यात एकूण १६१ महसुली गावे ०६ महसुली मंडळे व ३४ तलाठी साजी आहेत. जनसंवाद कार्यक्रमातून ४४ निवेदने प्राप्त झाली. यामध्ये महसूल फेरफार नोंद मालकी हक्क व घरकुल सर्वांसाठी घरे योजना पांदण रस्ते अतिक्रमण मुक्त करणे आणि पुरवठा बँक कर्ज कृषी व शेती विषयक समस्यांच्या समावेश होता. यावेळी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची १०० % नोंदणी करणे मोफत वाढू, ई-पीक पाहणी पिक व नैसर्गिक आपत्ती नुकसानभरपाई वेळेत देण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनास निर्देश
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना प्राप्त तक्रारींची तात्काळ नोंद घेऊन नियमानुसार व ठराविक कालमर्यादेत कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले तसेच नागरिकांच्या समस्या संवेदनशीलतेने हाताळून शासनाच्या विविध योजनांच्या लाभ पात्र लाभार्थी लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले.




