spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महारक्तदान शिबीरात ११२ रक्तदात्यानी केले रक्तदान

कन्हान :- जीवनदान महाकुंभ – २०२६ अंतर्गत महारक्तदान शिबीराचे रामानंदाचार्य संप्रदाय कन्हान सेवा केंद्रा व्दारे डोणेकर सभागृह कन्हान येथे आयोजित महारक्तदान शिबीरात ११२ रक्तदात्यानी रक्तदान केले आहे.

रक्ताच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण गमवावे लागतात. ही गरज लक्षात घेऊन समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी तसेच गरजु रुग्णांना मोफत वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या उदात्त हेतुने रामानंदाचार्य संप्रदाय कन्हान सेवा केंद्र व्दारे जीवनदान महाकुंभ-२०२६ अंतर्गत महारक्त दान शिबिराचे डोणेकर सभागृह जे एन रोड कन्हान येथे रविवार (दि.११) जानेवारी २०२६ ला सकाळी ८ ते सायं. ६ वाजेपर्यंत आयोजित शिबीराचे माजी उपाध्यक्ष जि प नागपुर शरद डोणेकर, नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. ” तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा ! ” या प्रेरणादायी संदेशात नागरिकांनी स्वयंफुर्त प्रतिसाद देत महारक्तदान शिबीरात ११२ रक्तदात्यानी रक्तदान केले. या महारक्तदान शिबीरात साईनाथ रक्तपेढी नागपुरच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थित सुरक्षित पद्धतीने रक्तसंकल न करण्यात आले. जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य रामानंदाचार्य दक्षिणपीठ नानिजधाम (महाराष्ट्र) यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविला जात असुन मानवी सेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमा तुन करण्यात येत आहे. सुनिल लाडेकर यांच्या हस्ते महारक्तदान शिबीराची सांगता करण्यात आली. रामानंदाचार्य संप्रदाय कन्हान सेवा केंद्रा च्या गुरूबंधु व भगिनीने शिबीराराच्या यशस्वितेकरिता परिश्रम घेतले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.