शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी बिआरएसपी ची जनसुनावणी मध्ये तक्रार

0
53

कन्हान :- पारशिवनी तहसिल येथे जिल्हाधिकारी इटणकर, मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या जनसुना वणी मध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी बिआरएसपी व्दारे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली.

रामटेक विधानसभा क्षेत्रात बहुजन रिपब्लिकन सोश्यालिस्ट पार्टी शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी सतत लढा देत आहे. याचाच एक भाग म्हणुन पारशि वनी तहसिल येथे जिल्हाधिकारी इटणकर, मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या निर्देशानुसार जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या विविध समस्या वर पार्टी कडुन निवेदन सादर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने युरिया देतांना लिकिंग सोबत नॅनो युरिया प्लस ची सक्ती करणे नॅनो घेण्यास नकार दिल्यास काही कृषी केंद्रात बिलामध्ये हेराफेरी करणे किंवा यूरिया नाही असे शेतकऱ्यांना स्पष्ट सांगण्यात येते. शेतकरी मुकाट्यानं अन्याय सहन करतात. यावर प्रतिबंध करण्यात यावा. प्रत्येक दुकानात उपलब्ध खताच्या साठा विवरण दर्शनी भागावर असावे. तसेच नेनो युरिया च्या बाटली वर “मुफ्त दुर्घट ना विमा” असे लिहिलं दिसुन येते. त्याचा खुलासा जन सुनावणी मध्ये करण्यात आला नाही. तालुक्यात ऑन लाईन धान केंद्र संख्या वाढवावी, बोनस फॉर्म इ सेवा केंद्रात उपलब्ध करावे. शासना व्दारे २०,००० रू प्रति हेक्टर ऐवजी धान पीक बोनस ४०,००० रू. करण्यात यावा. गावा-गावात सुरु असलेली अवैध धान्य खरेदी बंद करण्यात यावी. अशा विविध समस्याचे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी कृषी अधीक्षक यांना योग्य कारवाई करण्याचे लगेच निर्देश दिले. कृषी अधीक्षक यांनी बिआरएसपी च्या शिष्टमंडळाला योग्य कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी रामटेक विधानसभा प्रमुख शांताराम जळते, टेकाडी सर्कल प्रमुख राज गुरधे पाटील, समन्व्यक हरिश भेलावे, भगवान यादव शेतकरी संघटनेचे देवचंद कुंभळकर, सुरेश मेश्राम, कन्हान शहर प्रमुख प्रविन सतदेवे, महिला प्रमुख निर्मला मरकाम, शाहीर जयराम सोनेकर, रमेश शेंदरे, गज्जु बोरधारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.