जिल्हाधिकारी यांचे हस्ते जिल्हा युवा पुरस्काराचे वितरण

0
79

गडचिरोली :- महाराष्ट्र शासनाचे क्रीडा धोरण 2012 अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा राज्याचे युवा धोरण 2012 अन्वये जिल्ह्यातील युवक, युवती व संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार प्रतीवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे वतीने देण्यात येतो. जिल्हा युवा पुरस्कार निवड समिती, गडचिरोली मार्फत सन 202४-2५ या वर्षाकरीता पुढील प्रमाणे त्यांनी केलेले सामाजिक कार्याचा गौरव होण्याचे दृष्टीने पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली. यामध्ये युवक पंकज सुधाकर लाडे मु. चोप, पो. कोरेगांव, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली, जान्हवी विजय पेद्दीवार मु.पो.ता. चामोर्शी, जि. गडचिरोली व संस्था – आधार विश्व फाउंडेशन, गडचिरोली सुशिल रामराव हिंगे, आशिर्वाद हिंगे, आशिर्वाद नगर कॅनरा बँकेच्या मागे गडचिरोली, ता.जि. गडचिरोली यांची निवड करण्यात आली.

या पुरस्काराचे स्वरुप युवक – रोख रु. 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त), युवती – रोख रु. 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) व संस्था – रोख रु. ५0,000/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे असुन, स्वामी विवेकानंद यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय युवा दिन दि. 1२ जानेवारी, 202६ रोजी अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा युवा पुरस्कार समितीचे अध्यक्ष – अप्पर जिल्हाधिकारी नितिन गावंडे, गडचिरोली, सदस्य सचिव – जिल्हा क्रीडा अधिकारी, भास्कर घटाळे, पुरस्कारार्थी व संस्थेचे पदाधिकारी व कार्यालयीन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, भास्कर घटाळे यांनी कळविले आहे.