चाचेर येथे भव्य रक्तदान महाकुंभ

0
55

किशोर साहू, मौदा, ता.१४ :- जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये रविवार (दि. 11 जानेवारी)ला जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आले.या प्रसंगी अनेक युवा पिढी वर्गांनी रक्तदान करून मोलाचे सहकार्य केलं.याप्रसंगी भाजपा चाचेर मंडळ अध्यक्ष रवी चव्हाण ,माजी जि प सदस्य कैलास बरबटे, चाचेर सरपंचा लूंबिनी महेश कलारे, उपसरपंच रवींद्र ठाकरे,खंडाळा (गांगणेर) सरपंच तथा भाजपा किसान आघाडी महामंत्री संकेत झाडे, भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष संजू वाघमारे, काँग्रेसचे भावी जि प चे उमेदवार माजी सरपंच मदन बरबटे , ग्रा प सदस्या चंद्रकला धोटे , सत्संग मंडळी तालुकाध्यक्ष अशोक गजबे, मौदा तालुका ब्लड कॅम्प प्रमुख मौदा प्रफुल बादोले, जनार्धन बिसणे,वासुदेव नाटकर, निखिल नगरे ,दामिनी बिसणे, निकिता लांजेवार, सर्वरी बिसने, कल्पना बिसणे, वंदना लांजेवार, वंदना नाटकर ,पुंडलिक बिसणे, संतसंग अध्यक्ष शंकर गडे, गोपीचंद राऊत, सूर्यकांत आंबिलढूके ,विनोद कोपरकर, दिलीप घाटेसह मोठया प्रमाणात युवा मंडळी उपस्थित होते. 131 रक्तदातांनी या महाकुंभात आपले रक्तदान केले.