spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जिल्हा परिषद आवारातील ‘त्या’ दुचाकीचे गूढ १ तासात उकलले; पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांची वेगवान कारवाई

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- भंडारा जिल्हा परिषदेच्या आवारात मागील काही दिवसांपासून उभी असलेल्या एका दुचाकीचे गूढ अखेर उकलले आहे. भंडारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी माहिती मिळताच अवघ्या १ तासात तपासाची चक्रे फिरवून मूळ मालकाचा शोध लावला आणि वाहन त्याच्या स्वाधीन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या आवारात ‘हिरो करिझ्मा’ कंपनीची (क्र. MH 36 T 7452) ही मोटारसायकल मागील काही दिवसांपासून एकाच जागी उभी होती. सलग काही दिवस ही गाडी धूळ खात पडून असल्याने परिसरात विविध संशयास्पद चर्चांना उधाण आले होते. ही गाडी बेवारस आहे की एखाद्या गुन्ह्यातील? असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला होता. अखेर काही सजग नागरिकांनी या प्रकरणाची माहिती भंडारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांना दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पी.आय. भुसारी यांनी तातडीने सूत्रे हलवली. माहिती मिळाल्यापासून अवघ्या एका तासाच्या आत पोलिसांनी तांत्रिक तपास करून या गाडीचा मालक शोधून काढला. तपासात ही गाडी भंडारा वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस नाईक सुशील बोरकर यांची असल्याचे निष्पन्न झाले. सुशील बोरकर यांचा पाय फ्रॅक्चर झाला असल्याने त्यांना मागील काही दिवसांपासून आपली गाडी तेथून हलवता आली नव्हती. पोलिसांनी तात्काळ बोरकर यांच्याशी संपर्क साधून खात्री पटवून घेतली आणि सर्व संभ्रम दूर करत गाडी मालकाच्या स्वाधीन केली. काही दिवसांपासून उभा असलेल्या या गाडीचा प्रश्न पोलिसांनी अवघ्या तासाभरात मार्गी लावल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.