spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपाने ‘हॉट एअर बलून’ द्वारे दिला “करा मतदान, सांगतंय संविधान” चा संदेश

– मकरसंक्रांती निमित्त ‘बलून फेस्टिव्हल’ : स्वीप उपक्रमाला तरुणाईची साथ

नागपूर :- नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेद्वारा राबविण्यात येणाऱ्या सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत तरुणाईची उत्तम साथ मिळाली आहे. मकरसंक्रांत सणानिमित्त ‘हॉट एअर बलून’ हवेत उडवून मतदानाचा जागर करण्यात आला आहे. या माध्यमातून “करा मतदान, सांगतंय संविधान” असा संदेश देण्यात आला.

मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. स्वीप प्रमुख तथा उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मकरसंक्रात सणाचे औचित्य साधून मंगळवारी(ता.१३) ईश्वर देशमुख मैदानावर ‘बलून महोत्सवाचे’ आयोजित करून मतदानाबाबत जनजागृती करण्यात आले.

याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त  राजेश भगत, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर, क्रीडा निरीक्षक उज्वला चरडे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व प्रथम “करा मतदान, सांगतंय संविधान” चा जनजागृती फलक लिहून ‘हॉट एयर बलून’ हवेत सोडण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी मतदानाकरिता सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि अधिकाधित संख्येत मतदान करावे असे आवाहन केले.

मनपातर्फे स्वीप उपक्रमातंर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून, आतापर्यंत सेल्फी पॉईंट, मतदान अधिकार रथ, कॅम्पस कनेक्ट प्रोग्राम, वॉक विथ व्होटर, मतदार जागरुकता बाईक रॅलीचा समावेश आहे. स्वीप उपक्रमांतर्गत आज ईश्वर देशमुख महाविद्यालयात मकरसंक्रात सणाचे औचित्य साधून ‘बलुन फेस्टीव्हल’ मतदारांमध्ये जनजागृती करून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.