नागपूर ग्रामीण जिल्ह्यात गुन्हेगारीत घट, अवैध धंद्यांवर कारवाईत वाढ

0
63

नागपुर :-  हर्ष ए. पोहार, पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांनी अवैध धंदयातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्याने सन २०२४ च्या तुलनेत सन २०२५ मध्ये गुन्हेगारी मध्ये घट झाली असुन मध्ये अवैध धंद्यांवरील कारवाई मध्ये वाढ झालेली आहे.

सन २०२४ च्या तुलनेत सन २०२५ मध्ये मोटर सायकल चोरीच्या गुन्हयात ९१ ने घट, दरोडयाच्या गुन्हयात २ ने घट, घरफोडी २८ ने चोरी २३७ ने दंगा १५ ने तसेच दुखापतीच्या गुन्हयात ११६ ने घट झालेली आहे. एकुणच शरीराविरूध्द आणि मालमत्तेविरूध्द गुन्हयामध्ये सन २०२४ च्या तुलनेत सन २०२५ मध्ये २८५ ने घट झालेली आहे.

अवैध धंदयांवर विशेष मोहीम राबवुन केलेल्या कारवाई मुळे अवैध दारू च्या गुन्हयावरील कारवाईत २४९ ने वाढ झाली, अंमल पदार्थ विकी तस्करी गुन्हयााबाबत कारवाई मध्ये ७२८ ने वाढ झाली. जिवनाश्यक वस्तु कायदा कारवाई मध्ये ६ ने वाढ तसेच मोटर वाहन कायदया अन्वये करण्यात आलेल्या कारवाई मध्ये १२१५ अशी लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच एम.पी.डी.ए. कारवाई मध्ये १८ ने वाढ झाली असुन सन २०२५ मध्ये संघटित गुन्हेगारी करणाऱ्या आरोपीतांच्या ७ टोळयांमधील एकुण ४३ आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ (MCOCA) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.