spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वाहनासह ४५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची कामगिरी

भिवापूर :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलींग करीत असता गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, ट्रक क्रमांक एम एच ४०/डी सी ३२१० या वाहनाने पवनी नागभीड रोडकडुन नागपूरकडे टिप्परमध्ये अवैधरीत्या विनापरवाना रेती भरून येत आहे. अशा मिळालेल्या माहीतीच्या आधारे पथकाने मौजा जावराबोडी शिवार येथे नाकाबंदी केली असता ट्रक क्रमांक एम एच ४०/डी सी -३२१० हे वाहन मिळून आले वाहन संशयीत वाटल्याने वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळुन आली ट्रकचा चालक नामे १) महेश संजय वैद्य, वय २१ वर्ष, रा. पाचगाव उमरेड, ता. उमरेड, जिल्हा नागपूर क्लिनर नामे २) मुकेश जयपाल मेश्राम, वय १९ वर्ष, रा. पाचगाव उमरेड, तालुका उमरेड जिल्हा नागपूर हे मिळुन आले. मालकाचे नाव विचारले असता वाहन मालक आरोपी कं ३) मंगेश सुखदेव धावडे, रा. खेडी, ता. मौदा जि. नागपूर हा असल्याबाबत माहीती पोलीसांना प्राप्त झाली. पोलीसांनी वाहन चालकास रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याबाबत माहीती प्राप्त झाली. पोलीसांनी पंचासमक्ष वर नमुद वाहन १) ट्रक क्रमांक एम एच ४०/ डी सी ३२१० किंमती ४५,००,०००/- रूपये २) ०६ ब्रास रेती किंमती ३०,०००/- रूपये असा एकुण ४५,३०,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नमुद आरोपी यांच्या विरूध्द पोस्टे भिवापूर येथे कलम ३०३(२), ३(५) भा.न्या.सं सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहकलम ४, २१ खाण खनिज अधिनियम, ३ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४, सहकलम १५ पर्यावरण संरक्षण अधिनिय १९८६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.