spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महापालिकेच्या निवडणूक निकालाचा डाटा एक क्लिकवर उपलब्ध

– मनपाने विकसित केली लिंक

नागपूर :- नागपूर महापालिकेचा निकाल लागल्यानंतर लोकांमध्ये निकालाबद्दल उत्सुकता असते. मतदारांना व नागरिकांना महानगरपालिकेच्या निकालाची संपूर्ण माहिती नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून दिली केले आहे. यावर नागरिकांना प्रत्येक प्रभागाचा निकाल, राजकीय पक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी, झोननिहाय राजकीय पक्षांचे पक्षीय बलाबल, मनपाच्या सभागृहात प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधीत्व अशा सर्व मुद्यांचा विचार करून हे विकसित केले आहे. तसेच यावर माहिती डाऊनलोड करण्याची सुविधा दिली आहे. क्यूआर कोडचा वापर करूनही ही सर्व माहिती नागरिकांना जाणून घेता येणार आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपलेली आहे. परंतु या निकालाबद्दल संपूर्ण माहिती देण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात तसेच अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत व अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. माहिती तंत्रज्ञान विभागाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्या नेतृत्वात मनपाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख स्वप्निल लोखंडे यांनी ही सर्व माहिती एकत्रित लिंक विकसित केली आहे. ही लिंक मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांना https://civicpoll.emergent.host/citizen या लिंकवर जाता येईल.

ही लिंक उघडल्यानंतर शहरातील एकूण मतदारांची संख्या दिसून येते. त्याचप्रमाणे शहरातील निवडणुकीसाठी असलेल्या जागां, एकूण मतदान केंद्रे व या निवडणुकीत झालेल्या मतदानाची टक्केवारी दिसून येते. ग्राफीक्सच्या सहाय्याने या निवडणुकीनंतर आलेल्या निकालाची माहिती याठिकाणी उपलब्ध झाल्याने ती वाचनीय झाली आह. पक्षनिहाय जिंकलेल्या जागांचे ग्राफीक्स तयार केले आहे. त्याचप्रमाणे झोननिहाय पक्षीय बलाबल किती आहे, हे सुद्धा ग्राफीक्स सहाय्याने दाखविले आहे. यामुळे एकाचवेळी नागरिकांना शहरातील १० झोनमधील पक्षांची स्थिती समजून येते. या लिंकवर या सार्वत्रिक निवडणुकीत नागपुरातील मतदारांनी नोटाचा वापर केल्याची माहिती सुद्धा आहे. या संदर्भातील माहिती सुद्धा या लिंकवर उपलब्ध करून दिली आहे.

याच सोबत नागरिकांना आपला निवडून आलेला लोकप्रतिनिधी कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी फाईंड युवर वार्ड रिप्रेझेनेटेटिव्ह नावाने विंडो दिली आहे. यात उमेदवाराचे नाव व झोनचे नाव टाकल्यानंतर संबंधित नगरसेवकांचे नाव येईल. या सार्वत्रिक निवडणुकीत झोननिहाय झालेल्या मतदानाची माहिती दिली आहे. यात त्या झोनमध्ये सर्वाधिक नगरसेवक कोणत्या पक्षाचे निवडून आले, याची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे झोननुसार झालेल्या मतदानाची टक्केवारी सुद्धा नमूद केलेली आहे. तसेच शहरातील ३८ प्रभागात मतदानाची टक्केवारी सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. या निवडणुकीच्या संदर्भात सर्व माहिती एकाच क्लिकवर देण्याचा हा प्रयत्न केला आहे.

नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025- 26  च्या अंतिम निकालासह इतर माहिती जाणून घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा..https://civicpoll.emergent.host/citizen किंवा दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा.

Popular Articles