नागपूर :- दक्षिण नागपूर रिंग रोडवरील संजय गांधीनगर प्लांट नं. 221 येथील शालिनीताई सव्वालाके यांच्या घरी आगळ्या-वेगळ्या हळदी कुंकू चे आयोजन केले आहे. मकरसंक्रांतीचा हळदी-कुंकू कार्यक्रम साजरा करण्यात येतो. तो महिला च महिलांना अपमानास्पद वागणूक देउन जातात ! हे कुठेतरी थांबायला हवे ! यासाठी परिवर्तन घडवून आणले पाहिजेत. त्यासाठी सर्व महिलांसाठी व विशेष विधवा महिलांसाठी रहळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला जातो. विधवा महिलांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांच्या मनात परिवर्तन होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते. कारण त्यांना समाजामध्ये स्थान मिळालं पाहिजेत, यासाठी समाजसेविका शालिनीताई सव्वालाखे त्यांच्यासाठी नेहमी झटतात. दरवर्षी प्रमाणे विधवा महिलांसाठी व त्यांच्या मैत्रिणी व सर्वच महिलांसाठी हळदी कुंकू चा कार्यक्रम आयोजित केला आहे हा कार्यक्रम संजय गांधीनगर येथील रॉयल फर्निचर जवळ च्या गल्लीत शेंडे किराणा जवळ असलेल्या समाजसेविका शालिनी सव्वालाखे यांच्या घरी प्लांट नं. 221 श्री मार्ट जवळ मंगळवारी 20 जानेवारी ला सायंकाळी 4 वाजता. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला सर्व विधवा- महिलांनी उपस्थित राहावे. असे आवाहन केलेले आहे.








