– आमदार कृष्णा खोपडे यांनी केलेले आरोप मागे घ्यावे ! सर्व जिल्ह्यातून आशांचा संताप
नागपूर :- पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी पन्नास हजार मतदारांचे नाव मतदार यादीत नसल्या कारणाचा आशा वर्करवर केलेला आरोप निराधार असून मतदार यादीचे काम आशा वर्करकडे नसून इतर बीएलओ चे काम करणाऱ्या लोकांकडे असल्याचे वक्तव्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयु) चे अध्यक्ष कॉ.राजेंद्र साठे यांनी सांगितले. पूर्णपणे माहिती नसतांना निवडणूक आयोग व सत्ताधारी पक्षातर्फे केलेला घोळ असून आशा वर्कर वर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहे. वारंवार संघटने मार्फत आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातीलच मतदार यादीचे काम द्यावे. अशी मागणी वारंवार केल्या जात आहे. आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकाची पूर्णपणे माहिती असते त्यामुळे कोणतीही त्रुटी होऊ शकत नाही. परंतु मतदार यादीचे काम देताना त्यांच्या कार्यक्षेत्र पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरील भाग देण्यात येतो. मागील निवडणुकीत ज्यांचे नाव नव्हते त्यांनी ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्ज केल्यानंतर सुद्धा नावाची नोंद करण्यात आलेली नाही. मतदाराचे नाव त्यांच्या रहिवासी क्षेत्र किंवा प्रभागात असणे गरजेचे असताना सुद्धा हजारो नागरिकांचे नाव दुसऱ्या प्रभागांमध्ये नोंद करण्यात आले. त्यामध्ये सुधारणा करून योग्य ती मतदार यादी तयार करावी व आमदार कृष्णा खोपडे यांनी केलेले आरोप मागे घ्यावे. असा संताप जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर तर्फे करण्यात येत असून केलेलं वक्तव्य मागे घ्यावे. अशी मागणी कॉ. राजेंद्र साठे यांनी केली.








