नागपूर :- महाराष्ट्रात नुकत्याच संपन्न झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत व महानगरपालिका निवडणुकीत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि राज्याचे महसूलमंत्री, भाजपाचे ज्येष्ठ नेते समाजभूषण चंद्रशेखर बावनकुळे यांचे कुशल संघटन, कठोर परिश्रम, आणि लोकाभिमुख शासन व प्रशासन यामुळे या निवडणुकीत भाजपाला राज्यात भरघोस यश प्राप्त झाले असून निकालावरून भाजपा क्रमांक एक चा पक्ष आलेला आहे. यात यांचा मोलाचा वाटा असून, संपूर्ण समाजाला त्यांचा अभिमान आहे. त्यामुळे प्रांतिकचे, राज्य अध्यक्ष रामदास तडस यांचे नेतृत्वात, राज्य कार्याध्यक्ष गजानन शेलार, राज्य महासचिव डॉ.भूषण कर्डिले, राज्यकोषाध्यक्ष बळवंतराव मोरघडे यांनी चंद्रशेखर बावनकुळे याचे कोराडी, जिल्हा नागपूर येथील निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ व पेढा देऊन या यशाबद्दल अभिनंदन केले. व त्यांचे पुढील कार्यास सदिच्छा दिल्यात. यांप्रसंगी युवा आघाडी नागपूर विभाचे अध्यक्ष प्रवीण बावनकुळे सोबत होते. नागपूर महानगर पालिकेत तेली समाजाचे भाजपा पक्षाचे १९, शिवसेना (उबाठा) चे २ आणि काँग्रेस तर्फे १ उमेदवार असे एकूण २२ उमेदवार विजयी झाले आहेत.








