spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विद्यार्थ्यांची व्हॅन उलटली ; मोठा अनर्थ टळला ; पाच विद्यार्थी जखमी 

हंसराज, प्रतिनिधी भंडारा सिहोरा :- तुमसर – बपेरा राज्य मार्गावर असलेल्या खैरलांजी येथे शाळकरी विद्यार्थ्यांची मिनी बस पलटल्याने त्यातील 5 विद्यार्थी जखमी झाले आहेत.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे. हा अपघात खड्डे वाचविण्याच्या नादात झाला असल्याचे सांगितले जात आहे.लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या या निष्काळजीपणाचा नागरिक व पालक वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सिहोरा व परिसरातील विद्यार्थी तुमसर येथील फादर एग्नल शाळेत शिक्षण घेण्यासाठी दररोज ये – जा करीत असतात.काल 17 जानेवारी रोज शनिवारला सकाळी विद्यार्थ्यांची नियमित बस सुटल्यामुळे काही विद्यार्थ्यांना दुसऱ्या खाजगी व्हॅनने शाळेत घेऊन जात असतांना हा अपघात झाला. सकाळच्या सुमारास खैरलांजी गावाजवळ रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही व्हॅन रस्त्याच्या कडेला उलटली व झालेल्या या अपघातात व्हॅनमधील 4 ते 5 विद्यार्थी किरकोळ स्वरूपात जखमी झाले.घटनेचे वृत्त कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळ गाठले व विद्यार्थ्यांना व्हॅन मधून बाहेर काढून जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तुमसर-बपेरा या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहन धारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून या अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.