देवाने धडला दुःखीतांचा वाली खासदार संजयभाऊ देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून गंभीर अपघातग्रस्त रुग्णासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची मदत मंजूर…..

0
192
यवतमाळ १७ : कधीकधी संकटं अचानक कोसळतात आणि अशावेळी कोणीतरी देवदूत बनून धावून येतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे नुकताच वर्धा जिल्ह्यातील एक अपघातग्रस्त रुग्ण आणि त्याला मिळालेली मदत.
किशोर खेतूलाल भुतडा, रा. कारला रोड, शिवाजीनगर, वर्धा हे मार्केटहून मोटारसायकलने घरी जात असताना, मागून येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांना मानेवर आणि हाताला गंभीर दुखापत झाली. प्राथमिक उपचारासाठी त्यांना वर्धा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृतीच्या गंभीरतेमुळे त्यांना तातडीने कस्तुरबा गांधी रुग्णालय, सेवाग्राम येथे हलवण्यात आले. तेथूनही पुढील विशेष उपचारासाठी न्यूरॉन हॉस्पिटल, नागपूर येथे दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी चार लाख रुपयांच्या उपचार खर्चाची अपेक्षा व्यक्त केली.
रुग्णांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याने उपचाराचा खर्च उचलणे कुटुंबियांसाठी अशक्यप्राय होते. याच वेळी निलेश सोमाणी (वाशिम) यांनी ही माहिती खासदार संजयभाऊ देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिली आणि मदतीची विनंती केली.
खासदार संजयभाऊ देशमुख यांनी तत्काळ “माणुसकी हाच मोठा धर्म आहे” हे ध्यानात ठेवून, मतदारसंघाबाहेर असलेल्या रुग्णालाही मदतीचा हात दिला. त्यांनी आपल्या स्वीय सहाय्यक गजानन कदम यांना तातडीने कागदपत्रांची पूर्तता करून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले.
गजानन कदम यांनी स्वतः पुढाकार घेऊन निलेश सोमाणी यांच्याशी संपर्क साधला व आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा केली. त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून रामेश्वर नाईक (प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभाग) आणि अँड. विशाल ठाकरे यांच्या सहकार्याने किशोर भुतडा यांच्या उपचारासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मंजूर करून घेतली.
ही मदत मिळाल्यानंतर किशोर भुतडा व त्यांच्या कुटुंबियांनी “कठीण काळात देवासारखे मदतीला आले” असे म्हणून खासदार संजयभाऊ देशमुख, रामेश्वर नाईक, अँड. विशाल ठाकरे, निलेश सोमाणी आणि गजानन कदम यांचे मन:पूर्वक आभार मानले.
ही घटना केवळ एका मदतीची नोंद नसून, “राजकारण हे समाजकारणासाठी असावं” याचं जिवंत उदाहरण आहे. गरीब, गरजू आणि संकटात सापडलेल्यांना मदतीचा हात देणारा देवाने धाडलेला माणूस म्हणजे खासदार संजयभाऊ देशमुख अशीच लोकभावना पुन्हा एकदा दृढ झाली आहे.
खासदार संजयभाऊ देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून गंभीर अपघातग्रस्त रुग्णासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची मदत मंजूर…..
यवतमाळ : कधीकधी संकटं अचानक कोसळतात आणि अशावेळी कोणीतरी देवदूत बनून धावून येतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे नुकताच वर्धा जिल्ह्यातील एक अपघातग्रस्त रुग्ण आणि त्याला मिळालेली मदत.