जि प प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल भोवरी येथील विद्यार्थ्यांनी घेतली वृक्ष संगोपनाची शपथ 

0
89
किशोर साहू : मौदा, ता.१७:जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल भोवरी येथे  सकाळी 11:30 वाजता हरित महाराष्ट्र ,समृद्ध महाराष्ट्र ,एकाच दिवशी 15 जुलै 2025 रोजी 10 कोटी वृक्ष लागवड आणि  एक पेड मा के नाम  या उपक्रमाला अनुसरून शाळा व्यवस्थापन समिती  अध्यक्ष अंकुश निरगुळकर, प्रल्हाद वैद्य तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी तबस्सुम पठाण उपस्थितीत एकत्रित सहभागातून वृक्षारोपण करण्यातआले. शाळा आणि अंगणवाडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी आंबा, पेर, जांभळं, लिंबू, करवंदं आणि विविध फुल झाडांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक झाड लावुन  संगोपनाची  शपथ घेतली.