एक पेड मा के नाम उपक्रमांतर्गत जि. प. प्राथमीक शाळा तोंडली येथे प्रमाणपत्र वाटप

0
80
 किशोर साहू: मौदा, ता.१७ : हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान अंतर्गत वर्ष 2025 करिता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे 1 जुलै ते 15 जुलै वृक्षारोपण सप्ताह साजरा झाला. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांनी वृक्षारोपण करून उपक्रमात सहभाग नोंदवला. एक पेड मा के नाम उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी 75 पेक्षा जास्त वृक्ष लागवड केली. त्यानुसार प्राप्त प्रमाणपत्राचे सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले .
यावेळी तोंडली गावच्या सरपंचा दर्शना बागडे, उपसरपंच रामपाल धांडे, प्रमोद बागडे ,शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे उपस्थित होते.