किशोर साहू: मौदा, ता. १७ : बुधवार (दि.16 जुलै ) ला खात ग्राम पंचायतच्या वतीने महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून एक पेड़ माँ के नाम कार्यक्रम अंतर्गत तालुक्यातील खात येथील प्रियदर्शनी शाळा येथे वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी माजी जि प सदस्या राधा मुकेश अग्रवाल सरपंचा माधुरी कैलाश वैद्य, भाजपा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल
ग्रामपंचायत सदस्यगण रविन्द्र मंडारकर ,अरविंद तांबूलकर, शिक्षकवृंद संजय वैद्य,ठाकरे पाटील ,जनु मेंढे, झिंगाबाई, आशीर्वाद ढोलवार, चेतन डहाके, गावातील नागरिक तसेच शाळकरी मुले उपस्थित होते.




