नागपूर, ता. १८ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. गुरूवार (ता.17) रोजी शोध पथकाने 35 प्रकरणांची नोंद करून 29,700/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 6,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 100/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400/-दंड) या अंतर्गत 05 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रूपयांची वसुली करण्यात आली.मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2,000/-रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 08 प्रकरणांची नोंद करून 6,000/- रुपयांची वसुली करण्यात आली.चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली.उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 14 प्रकरणांची नोंद करून 2,800/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 04 प्रकरणांची नोंद करून रु.4,000/- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे.सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका, कचरा जाळून उपद्रव निर्माण करणे या अंतर्गत 01 प्रकरणाची नोंद करून रू.5,000/- वसुल करण्यात आले. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत तुळशीबाई राईकवार यांनी मोठया प्रमाणात कचरा जाळल्यामुळे रु. 5,000/- चे दंड वसूल करण्यात आले.हनुमान नगर झोन अंतर्गत गौरव पवार यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले.धंतोली झोन अंतर्गत मे. शेष पुष्प रेसीडेंसी यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसूल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे.सम्राट दवाखाना यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले.तसेच मे. राधे किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले.सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. रहेमान डिस्पोजल एजंसी यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. राठोड कंसट्रक्शन्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसूल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 11 प्रकरणांची नोंद करून रू. 45,000/- दंड वसूल केला.




