spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गोपेवाड्यात अज्ञात इसमाने पाच वाहने पेटवली; ५ लाखांचे नुकसान

हंसराज, प्रतिनिधी भंडारा शहापूर :- येथील नेहरू वार्ड, गोपेवाडा येथे घरासमोर उभ्या असलेल्या पाच वाहनांना अज्ञात इसमाने आग लावून जाळल्याची धक्कादायक घटना २४ जानेवारीच्या मध्यरात्री घडली. या आगीत पाच लाख रुपयांच्या मुद्देमालाचे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन धनराज गडेकर (३३, रा. गोपेवाडा) यांच्या घरासमोर आणि रस्त्याच्या कडेला त्यांची वाहने उभी होती. २४ जानेवारीच्या रात्री १:३० ते ३:०० वाजताच्या दरम्यान अज्ञात इसमाने द्वेषातून किंवा नुकसान करण्याच्या उद्देशाने या वाहनांना आग लावली.

या आगीत १) सीडी डिलक्स (१० हजार रु.), २) इलेक्ट्रिक मोपेड (६० हजार रु.), ३) होंडा ऍक्टिव्हा (५० हजार रु.), ४) रॉयल एनफिल्ड बुलेट (८० हजार रु.) आणि ५) ह्युंदाई i10 कार (३ लाख रु.) अशी एकूण ५ लाख रुपयांची वाहने जळून खाक झाली.

याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक २१/२०२६, कलम ३२६ (F) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुधकवरा करीत आहेत.

Popular Articles