गोवंशाची कत्तल करणारे कत्तलखाने बंद करा – प्रवीण दटके

0
83

 

वणी १९ : यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील दीपक चौपाटी परिसरात सार्वजनिक ठिकाणी दिनांक 11 जानेवारी 2025 ला गोवंशाचे मुंडके कापून फेकल्याचे आणि मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल करून तुकडे फेकल्याचा मुद्दा प्रवीण दटके यांनी विधानसभेत उचलला.

गोवंशाची कत्तल झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर लगेच दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी वणी शहरातच अवैध बिर्याणी सेंटर मधून गौवंश मासाची बिर्याणी करून ती विक्री करत असल्याची असल्याचे आणि मंजुषा बार जवळ गोवंश आणि तसेच वंशाचे मास पोत्यात बांधून टाकले असल्याची बातमी पसरली. पोलिसांना गोवंश मिळाले असताना सुद्धा कत्तलखाना नष्ट करण्यासाठी कोणतीही कारवाई झाली नसल्याबाबत आमदार प्रवीण दटके यांनी आवाज उठवला.

सदर जागेची व्हिडिओग्राफी करणे तसेच अतिक्रमित जागेवर बांधलेले शेड नष्ट न करणे याबाबत पोलिसांकडून दिरंगाई झाल्याचे दटके यांनी म्हटले. पोलिसांनी आरोपींवर कारवाई न करता फक्त पुरावे नष्ट करून निष्काळजीपणे वर्तणूक केल्यामुळे गो तस्करांना पाठबळ मिळत असल्याचे देखील दटके यांनी सांगितले.
याबाबत त्वरित दखल घेऊन गो वंशाची कत्तल करणाऱ्यावर कारवाई करावी तसेच गोमास विक्री करणाऱ्या हॉटेल आणि आस्थापनांवर कारवाई करा अशी मागणी दटके यांनी केली. यावेळी सदर घटनेची नोंद घेऊन तात्काळ दोषींवर कारवाई करू तसेच ज्या हॉटेलमध्ये गोमांस विक्री होत आहे त्यांचे लायसन्स रद्द करू असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आश्र्वासित केले.