spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चुलरडोहच्या जंगलात वाघाचा थरार; गाईचा फडशा पाडल्यानंतर शिकारीवर येताना वाघ कॅमेऱ्यात बंदिस्त

– सिहोरा परिसरात नागरिकांमध्ये भीती; शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत देण्याची ग्रामस्थांची मागणी

हंसराज, प्रतिनिधी भंडारा सिहोरा :- हरदोली वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या चुलरडोहच्या जंगलात दबा धरून असलेल्या पट्टेदार वाघाने गाईची शिकार केल्याच्या घटनेचे वृत्त नुकतेच हाती आले आहे.या घटनेने परिसरातील नागरिकात चांगलीच धडकी भरली असून यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी नथू फागणलाल पारधी हा नेहमीप्रमाणे शुक्रवारी 30 जानेवारी रोजी दु 2 च्या सुमारास गाईला चराईसाठी घेऊन गेला होता.

गाय चराईवर असतांनाच शेता लगत असलेल्या जंगलात दबा धरून असलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला चढविला.हल्ला एवढा भीषण होता की गाय आपला जीव वाचविण्याचा प्रतिकार करू शकली नाही आणि वाघाने तिला जागीच ठार केले. सायंकाळी गाय घरी न आल्यामुळे शेतकरी नथू पारधी यांनी जंगलाच्या दिशेने शोध घेतला असता गाय छिन्न भिन्न व मृत अवस्थेत दिसून आल्याने घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली.

वन विभागाचे अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत घटनास्थळावर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असता वाघ त्याच ठिकाणी शोध घेत पुन्हा शिकारीच्या मार्गावर येऊन शिकारीवर ताव मारला व तोच वाघ वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाल्याने चुलरडोह परिसरात वाघाचा मुक्त संचार असल्याचे स्पष्ट झाले. कॅमेऱ्यात कैद झालेल्या वाघानेच या गाईची शिकार केल्याचा खुलासा ३१ जानेवारी रोजी झाल्याचे उल्लेखित आहे.

वाघाने केलेल्या हल्ल्यात पशुपालक नथु पारधी यांचे मोठे नुकसान झाले आहे.अल्प भूधारक शेतकरी असून गाय त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन असल्याचे सांगितले जाते.गाय वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याचे स्पष्ट झाल्याने गाईचा पंचनामा सुद्धा करण्यात आला.शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे तर गावालगतच जंगल असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व एकट्याने जाण्याचे टाळावे असे आवाहन वनविभागाचे अधिकारी छ.ग. रहांगडाले यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.