– कन्हान हाकर्स युनियन, कन्हान कृति समितीचे नगराध्यक्षा निवेदन
कन्हान :- आनंद रेस्टॉरंट ते इंडियन नॅशनल होम पाइ प कंपनी गेट दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ लगत नाली (ड्रेनेज) व फूटपाथवर ले-आउट धारकाने टाक ण्यात आलेल्या गिट्टी, माती, बोल्डर व मलब्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्ये विषयी कन्हान हॉकर्स युनियन, कन्हान कृती समिती च्या शिष्टमंडळा व्दारे नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देऊन संबधित ले-आऊट धारकावर दंडत्माक कार्यवाही करून ही समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी करण्यात आली.
दि.४ जानेवारी २०२५ ला नगरपरिषदेने आंनद रेस्टोरेंट ते होम पाईप कंपनी गेट पर्यंच महामार्गाच्या एकीकडे अतिक्रमणात ८० दुकाने तोडुन कार्यवाही करून दुकानदाराना बेरोजगार केल्यावर ग्रोमोर वेंचर्स ले-आउट धारक द्वारे हिन्दुस्तान लीवर लिमिटेड कंपनीची संरक्षण भित तोडुन मध्यरात्री याच महामार्गाची नाली (ड्रेनेज) आणि फूटपाथ पर मलबा, गिट्टी, बोल्डर , माती व मलबा टाकुन समस्या निर्माण केली. त्याच प्रमाणे (दि.२) ऑगस्ट २०२५ को ले-आउट धारकाने गिट्टीचा ट्रक ले-आउट मध्ये नेताना एनएचएआय ची नवीन नाली (ड्रेनेज) होम पाईप कंपनी गेटच्या जवळ. पास नाली (ड्रेनेज) तोडुन टाकली आहे. नगरपरिषद कार्यालयात वेळोवेळी म्हणजे १) दि. ०८/०१/२०२५, २) १६/०१/२०२५, ३) १०/०३/२०२५, ४) ०५/०६/ २०२५ ला पत्र देऊन योग्य कार्यवाही ची मागणी कर ण्यात आली. परंतु नगरपरिषद प्रशानाने नाली वरील मलबा हटविला नाही. आणि संबधित ले-ऑऊट धार कावर दंडात्मक कारवाई तर दुरच अद्याप ती तोडलेली नाली दुरूस्त न केल्याने आरोग्य आणि अपघातामुळे जीवहानी होण्याची समस्या निर्माण झाल्याने कन्हान हाकर्स युनीयन, कन्हान कृति समिती पदाधिका-यांच्या शिष्टमंडळाने सोमवार (दि.२) फेब्रुवारी ला नवनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे हयाना भेटुन चर्चा करून निवेदन देऊन संबंधित ले-आऊट धारकाने करण्यात आलेल्या बेकायदेशीर अडथळ्यामुळे सार्वजनिक आरोग्य, वाहतुक तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेस निर्माण झालेल्या गंभीर धोक्याची सविस्तर माहिती नगराध्यक्ष यांना दिली. तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांनी बांधलेल्या नविन ड्रेनेज नालीचे झालेले नुकसान व अद्याप न झा लेली दुरुस्ती याकडे ही त्यांचे लक्ष वेधण्यात आले. नगराध्यक्षानी या विषयावर सकारात्मक चर्चा करित संपुर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत १५ दिवसांच्या आत संबंधित विभागांना निर्देश देऊन योग्य व कायदे शीर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वसित केले. तसेच बेकायदेशीरपणे टाकलेला मलबा तात्काळ हट विणे व नुकसानग्रस्त ड्रेनेज नालीच्या दुरुस्तीची आव श्यक कार्यवाही तातडीची करण्यात येईल, असे ही त्यांनी स्पष्ट केले. कन्हान हॉकर्स युनियन, कन्हान कृती समिती व्दारे मा. नगराध्यक्ष साहेबांनी दिलेल्या आश्वासनाबद्दल समाधान व्यक्त करून प्रशासनाने दिलेल्या काल मर्यादेत ठोस व प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना कन्हान हाकर्स युनियन, कन्हान कृति समिति सदस्य चिराल वैध, सचिन चकोले, किष्णा मोहबे, नुसरत परवेज, प्रकाश सिंग, प्रदीप गायकवाड़, अजय चव्हाण, गजानन कपाटे, रॉबिन निकोसे, सुभाष चंद्र अहिरवार, रामाधार बुंदेलिया, प्रतिभा हारगुडे, इंदी रा वाल्दे, सरोज बुंदेलिया, वनिता बूंदेलिया, सुनिल बुंदेलिया आदी सह दूकानदार उपस्थित होते.



