नागपूर :- सालई गोधनी हुडकेश्वर रोड येथे, श्री संत रविदास जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला रविदास धाम च्या मंदिरावर संत रविदास यांच्या प्रतिमेला लखन एरावार नगरसेवक यांचे हस्ते हार अर्पण करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी ज्ञानेश्वर बसेशंकर, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी श्री संतांच्या विचार यावर प्रकाश टाकण्यात आला. श्री संत रविदास धाम हें विदर्भातील सर्वात मोठे धाम असल्यामुळे दिवसभर दर्शन करण्याऱ्या भाविकांची गर्दी उसळली होती. कार्यक्रमाचे संचालन श्री मंदिराचे व्यवस्थापक प्रकाश कुहिकर यांनी केले तर याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. मीना शेंडे पोलीस पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला सर्वश्री रवी बनसोड, वासुदेव डहाके, जव्हार कुहीकर, लालचंद शेंडे, इतर सहकारी उपस्थित होते. सरते शेवटी प्रसाद म्हणून हलवा वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात चर्मकार समाज मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.



