spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्वरमेघ फाउंडेशन तर्फे मानपत्र व स्वरचैतन्य पुरस्काराने सन्मानित

नागपूर :- स्वरमेघ आर्ट फाउंडेशन तर्फे आयोजित सोहळ्यात सुप्रसिद्ध गजल गायक सुरेश दंडे यांना मानपत्र प्रदान करून सन्मानित तसेच सुप्रसिद्ध गजल गायक शिशिर पारखी यांना राज्यस्तरीय स्वरचैतन्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. आणि दीपश्री पाटील यांना त्यांच्या सांगीतिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. स्वरमेघ आर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष मनीष उपाध्ये आणि प्रमुख अतिथी डॉ. साधना शिलेदार यांच्या शुभहस्ते हा सन्मान देण्यात आला. मानपत्राचे लेखन व वाचन अंजली उपाध्ये यांनी केले. रोड सेफ्टी या विषयावर शॉर्ट फिल्म तयार होते आहे. या शॉर्ट फिल्मचे निर्माते मनीष उपाध्ये आणि रोडमार फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश वाघ हे आहेत. त्या शॉर्ट फिल्मच्या पोस्टरचे विमोचन देखील करण्यात आले. तसेच डॉ. दत्ता हरकरे यांच्या ग्रंथ अभिवाचनाच्या युट्युब चॅनेलचे विमोचन करण्यात आले. यशस्वीरित्या संस्थेचे पदाधिकारी सर्वश्री प्रबोध देशपांडे, दिनेश टेकाडे, राजेश दुर्गे, विशाखा पाध्ये, शर्वरी पुराणिक, तनय पाध्ये यांनी अथक परिश्रम घेतलेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.