spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या ६६ प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ७९ मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. मंगळवार (ता.३०) शोध पथकाने ६६ प्रकरणांची नोंद करून ३२००० रुपयाचा दंड वसूल केला.

हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता करणे (रु. ४०० दंड) या अंतर्गत २७ प्रकरणांची नोंद करून १०८०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू. ४०० दंड) या अंतर्गत ४ प्रकरणाची नोंद करून १६०० रूपयांची वसुली करण्यात आली.

मॉल, उपहारगृहे, लाँजिग, बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून २००० रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत १७ प्रकरणांची नोंद करून ११००० रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गराज व इतर दुरुस्तीचे व्यवसायिकाने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ४ प्रकरणांची नोंद करून ४००० रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास १३ प्रकरणांची नोंद करून २६०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत श्री. गगन पोल सावजी यांच्यावर इमारत पाडकाम दरम्यान अस्वच्छता पसरविल्या सह वायू प्रदूषण केल्याप्रकरणी रु.५,००० चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे.समर्थ किराणा स्टोअर आणि मे.आमीन स्वीट भंडार यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रू. ५,००० असे एकूण १०,००० दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. हिरवाणी बिल्डिंग कंत्राटदार यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल रू.१०००० चा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने ०४ प्रकरणांची नोंद करून रू. २५००० चा दंड वसुल केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.