काटोल १९ : दिनांक १७/०७/२०२५ चे २३:०० वा. ते दिनांक १८/०७/२०२५ चे ०५:०० वा. दरम्यान जिल्हा गस्त मध्ये बापु रोहोम, उपविभागिय पोलीस अधिकारी, काटोल विभाग यांनी संपुर्ण जिल्हयात सतर्कपणे गस्त केली. तसेच पोलीस स्टेशन काटोल अंतर्गत अण्णाभाऊ साठे नगर, पेठ बुधवार, काळे चौक, हत्तीखाना, सावरगाव रोड येथे पायदळ पेट्रोलींग करून कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले. सदर कोबिंग ऑपरेशन बापु रोहोम यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले असुन रेकॉर्डवरील गुन्हेगार, जेल रिलीज गुन्हेगार, निगराणी बदमाश तसेच अवैध दारू विक्रेते गुन्हेगार चेक करून त्यांचे घराची पंचासमक्ष घरझडती घेण्यात आली. तसेच गळपुरा चौक येथे नाकाबंदी करून संशयीत वाहनांची तपासणी करण्यात आली. सदर कारवाईमध्ये पोलीस स्टेशन काटोल चे अधिकारी, अंमलदार आणि दंगा नियत्रंण पथकाचे अंमलदार हजर होत



