पोलीस स्टेशन बोरी हददीमध्ये हरविलेले/गहाळ झालेले १५ मोबाईल त्यांचे मुळ मालकांना परत देण्यात आले

0
61

नागपुर १९ : नागपुर ग्रामीण जिल्हया अंतर्गत पोलीस स्टेशन बोरी हददीमध्ये सन २०२४ ते २०२५ गहाळ झालेले वेगवेगळया कंपनीचे अॅड्रॉईड मोबाईलचा बोरी पोलीसांनी सायबर पोलीस स्टेशन नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मदतीने तांत्रीक पदधतीने शोध घेवून CEIR पोर्टलचा वापर करुन १० नागरिकांचे मोबाईल दिनांक १८/०७/२०५ रोजी पोलीस स्टेशन बोरी येथे त्याचे मुळ मालकांना परत केले. मोबाईल मुळ मालक नामे १. अमोल वानखेडे, रा. जुनी वस्ती यांचा टेक्नो कंपनीचा मोबाईल, २ सतिष शेषराव शेळके, रा. सातगाव यांचा रिअल मी ११ प्रो कंपनीचा मोबाईल, ३. राकेश सिंग, रा. जुनी वस्ती बोरी यांचा व्हिवो वाय २९ कंपनीचा मोबाईल, ४. प्रविण सिहोरे, रा. सातगांव यांचा व्हिवो वाय ११ कंपनीचा मोबाईल, ५. कुंदन ताजणे रा. अमरावती यांचा वन प्लस कंपनीचा मोबाईल ६. रोहीत डोंगरे, रा. सातगाव रिधोरा यांचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट, ७. मुस्ताक शेख, रा. बुटीबोरी यांचा रेडमी कंपनीचा मोबाईल, ८. निर्भया दुपट्टे, रा. जुनी वस्ती बोरी यांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल, ९. अन्सार शेख रा. बुटीबोरी यांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल १० मुकेश पटेल, रा.बोरी यांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल असे मोबाईल श्री. दिपक अग्रवाल, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नागपुर विभाग यांच्या हस्ते त्यांचे मिळुन आलेले मोबाईल परत देण्यात आलेले आहे. सदर वेळी पोलिस निरीक्षक श्री प्रतापराव भोसले, प्रभारी अधिकारी पोस्टे बोरी यांचेसह बोरी पोलीस स्टेशन चे अधिकारी अंमलदार हजर होते. यापुर्वी दिनांक १०/०६/२०२५ रोजी पोलीस स्टेशन बोरी येथे त्याचे मुळ मालकांना परत केले. मोबाईल मुळ मालक नामे १) निखिल सुरेश वासे, रा. १४६ श्रीकृष्ण नगर , बुटीबोरी, २)श्री प्रतिक सुभाष हडगे, रा. पुष्कर सोसायटी बुटीबोरी ३) भुषण कुंभलकर, रा. सातगाव रोड, बुटीबोरी ४) सौ. बबीता निकेश सहारे, रा. बुटीबोरी, ५) श्री गणपत बालकृष्ण चिकणकर, रा. बुटीबोरी, यांना परत केले आहे.
नागपुर ग्रामीण पोलीसांकडुन नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी त्यांचा मोबाईल हॅन्डसेट गहाळ झाल्या नंतर किंवा चोरीस गेल्यानंतर त्याची माहीती तात्काळ पोलीसांना द्यावी तसेच त्याबाबतची माहीती https://www.ceir.gov.in या पोर्टलवर माहीती भरून तकार नोंद करावी. त्यामुळे गहाळ झालेले किंवा चोरीस गेलेले मोबाईलचा तांत्रीक पदधतीने शोध घेता येईल.