नागपुर १९ : पोलीस स्टेशन काटोल: दिनांक १७/०७/२०२५ रोजी काटोल पोलीसांना माहीती प्रात्प झाली
की, द न्यु चाय सुट्टा कॅफे दुकान येथे अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकी केली जाते या बाबत एक व्हिडीओ व्हायरल झालेला आहे. काटोल पोलीसांनी तात्काळ द न्यु चाय सुदृट्टा कॅफे, ब्लॉक क्रमांक ७, जगतगुरू तुकाराम महाराज व्यापारी संकुल, नगर परीषद काटोल येथे जावुन पाहणी केली असता सदर कॅफे च्या कांउटर आरोपी कं १) नामे रूपल जगदिश गजभिये, वय २१ वर्षे,रा घोडे प्लॉट, काटोल हा मिळुन आला. तसेच सदर कॅफे कोणाच्या मालकीचे आहे याबाबत विचारना केली असता आरोपी कं २) नामे रोशन दिपक बोरडे, वय ३० वर्षे, रा. सिंगारखेडा ता. नरखेड जि नागपुर अशी माहीती प्राप्त झाली. तसेच सदर दुकान दिपक बोरडे याने त्याचा लहान भाउ आरोपी के ३) भुषण दिपक बोरडे, वय २८ वर्षे, याला चालविण्यास दिलेले असल्याची माहीती समजली. आरोपी रूपल जगदिश गजभिये याला अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की, ५ ते ६ दिवसांपुर्वी एक १३ ते १४ वयोगटातील मुलगा एकटाच आला आणि त्याने दुकानातुन सिगारेट खरेदी केली दुकानात बसुन तिचे सेवन केले. नमुद आरोपीतांनी सदर मुलगा अल्पवयीन आहे हे माहीत असतांना सुध्दा त्याला सिगारेट विकत दिली आणि त्याला जागा उपलब्ध करून दिली.
नमुद आरोपी के १ ते ३ यांच्या विरूध्द कलम ७७ मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच सदर दुकानाचा परवाना रद्द कारण्यासाठी संबधीत कार्यालयाला पत्र व्यवहार करण्यात आला आहे.
नागपुर ग्रामीण पोलीसांकडुन जनतेला आवाहन करण्यात येते की, अल्पवयीन मुलांना कोणतेही मादक पदार्थ अथवा तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यास देणे, विक्री करणे हा गुन्हा असून अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास नजिकच्या पोलीस स्टेशनला किंवा डायल ११२ वर संपर्क करून माहीती दयावी.
अल्पवयीन मुलांना तंबाखुजन्य पदार्थ विक्री करून सेवन करण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्या आरोपीतांवर गुन्हा नोंद


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



