मनपा आयुक्तांच्या हस्ते मुख्यालयातील ‘इंटक’ च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

0
53

नागपूर :- मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते गुरुवारी (ता.५) मनपा मुख्यालय परिसरातील राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशन (इंटक) संघटनेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्यासह उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त श्याम कापसे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, इंटकचे अध्यक्ष सुरेन्द्र टिंगणे, कार्याध्यक्ष बाबाराव श्रीखंडे, महासचिव प्रवीण तंत्रपाळे आणि कोषाध्यक्ष योगेश बोरकर आदी उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी मनपा आयुक्त तथा डॉ. अभिजित चौधरी यांनी कार्यालयाची पाहणी करून संघटनेला शुभेच्छा दिल्या. यावेळी संघटनेचे माजी महामंत्री रंजन नलोडे, उपाध्यक्ष अरुण तुर्केल व सचिन मेश्राम, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भीमराव मेश्राम, महेंद्र बोस, धरमदास मेश्राम, सचिव विकास सरोदे, भूपेंद्र तिवारी, विजय मनघरे, विनित टेंभुर्णे, प्रदीप होले, पुरुषोत्तम कैकाडे, विजय खोब्रागडे,  विश्वास सेलुकर, आशुतोष पानतावणे, रविंद्र बंड, कांचन जुगेल, शितल जांभुळकर, अश्लेषा खोब्रागडे, अल्का मनोरकर, कल्पना रहाटे, मालती जांभुळकर यांच्यासह यांच्यासह संघटनेचे अनेक सक्रिय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.