spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

छिंदवाडा मार्गावरील पूनम चेंबर्समधील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरूवात

– मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस बंदोबस्तात कारवाई

नागपूर :- माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेचा प्रवर्तन विभाग व मंगळवारी झोन कार्यालयाच्या पथकाने आज (ता. ५) छिंदवाडा मार्गावरील पूनम चेंबर या बहुमजली इमारतीमध्ये असलेले जवळपास ७० अनधिकृत बांधकामे पाडण्यास सुरूवात केली.

या इमारतीमध्ये बेसमेंट असलेल्या अनधिकृत बांधकामावर आज हातोडा मारण्यात आला. यासंदर्भात गाळेधारकांना यापूर्वीच मनपाच्या प्रवर्तन विभाग व मंगळवारी झोन तर्फे नोटीस बजावण्यात आली होती. यात ४ फेब्रुवारीपर्यंत गाळे रिकामे करण्याचे निर्देश दिले होते. मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका रिट याचिकेनुसार गैरअर्जदार नंदकुमार हरीचंदानी यांना इमारत बांधकाम मंजुरी तथा मालकी हक्काचे दस्ताऐवज व्यक्तीशः सादर करण्याचे निर्देश २८ नोव्हेंबर २०२५ रोजी दिले होते. गेल्या ४ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या मा. उच्च न्यायालयातील सुनावणीच्यावेळी गैरअर्जदार श्री. नंदकुमार हरीचंदानी हजर झाले नाही. तसेच यासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता सुद्धा कार्यालयात केली नाही.

यामुळे महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३ (१) नुसार नोटीस बजावली आहे. गेल्या २० जानेवारीला त्यांना अंतिम आदेश देऊन १५ दिवसात अनधिकृत बांधकाम तोडण्याचे निर्देश दिले होते. परंतु, ही कारवाई न झाल्याने मनपाच्या प्रवर्तन विभागाने ४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सर्व गाळे रिकामे करण्याचे तसेच ५ फेब्रुवारीला अनधिकृत बांधकाम पाडण्याचे कामाला सुरूवात करण्यात येईल, असे बजावले होते.

यानुसार मनपाचे उपायुक्त तथा मंगळवारी झोनचे सहाय्यक आयुक्त अशोक गराटे, प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त हरीश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईला गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरूवात झाली. प्रवर्तन विभागाचा तोडू पथक, सिव्हील कार्यालयातील पथकासह जवळपास ४० कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. प्रवर्तन विभागाचे अधीक्षक संजय कांबळे तसेच मंगळवारी झोनचे उपअभियंता प्रशांत नेहारे यांच्या नेतृत्वात ही कारवाई सुरू झाली. यावेळी नागपूर पोलिसांच्या बंदोबस्त लावण्यात आले. यावेळी मनपाचे कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर मिटकरी, अशोक खेडकर व दीक्षा कळसकर उपस्थित होते. प्रवर्तन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हातोडा, सब्बल मारून अनेक अनधिकृत बांधकाम तोडले. यावेळी गाळेधारकांना सामान बाहेर करण्याची संधी ही देण्यात आली.

११ गाळ्यांना स्थगनादेश

याच इमारतील ५ मालकाच्या ११ गाळ्यांवर आज कारवाई होऊ शकली. मा. उच्च न्यायालयाने आज (ता.५) या गाळ्यांवर कारवाई करून नये, असे निर्देश मनपा प्रशासनाला दिले आहेत, असे मनपाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.