– नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांना निवेदन
कामठी :- शहरातील प्रभाग 16 येथे गौतम नगर भागात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी रमाई आंबेडकर यांचा एकमेव पूर्णाकृति पुतळा असून 7 फेब्रुवारी ला रमाई यांच्या जयंती दिनी येथे नगर परिषद मार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध करून दयावा अश्या मागणी चे निवेदन भाजपा पदाधिकारी उज्वल रायबोले यांनी नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांना सोपविले.
रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनाद्वारे अभिवादन करण्यात येते, करिता रमाई पुतळा परिसरात स्वच्छता,प्रकाश व्यवस्था आदी करण्याची मागणी निवेदना द्वारे करण्यात आली.
नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी संबधित विभागा चे अधिकारी विरेंद्र ढोके यांना आवश्यक कार्यवाही चे निर्देश दिले.
भाजपा पदाधिकारी उज्वल रायबोले,विक्की बोंबले, अरविंद चवडे, सुबोध चांदोरकर,अनिल बोरकर, अनमोल तिरपुड़े, रोहित मेश्राम, गौरव रामटेके, अनिकेत चाटे, मौसम शेंडे, शशिकांत रंगारी, जितेंद्र खोबरागडे यांनी नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांचे आभार मानले.



