घोरपड येथे पोरवाल महाविद्यालयातील रासयोतर्फे श्रमसंस्कार शिबिराचे थाटात उद्घाटन

0
60

कामठी :- स्थानिक घोरपड गट -ग्रामपंचायत येथे सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना तुकडीतर्फे आयोजित सात दिवसीय श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एस. एस. धोंडगे, उद्घाटक म्हणून डॉ.सोपानदेव पिसे, रा. से. यो. संचालक, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर, प्रशासकीय निर्देशक प्रो. डॉ. विनय चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. स्वप्नील दाहात घोरपड गट -ग्रामपंचायतीच्या सरपंच तारा कडू, गीता पांडे, सुनीता कोर्वेकर, आशा कुरडकर,ग्रामपंचायत सदस्या, उपप्राचार्या डॉ. रेणू तिवारी, उपप्राचार्य डॉ.मनिष चक्रवर्ती, रासयो अधिकारी डॉ.विनोद शेंडे, रासायो महिला अधिकारी डॉ.निशिता अंबादे , कुळसंगे, उप मुख्याध्यापक आदि उपस्थित होते.

रासयो अधिकारी डॉ.विनोद शेंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात “युथ फॉर माय भारत आणि यूथ फॉर डिजिटल भारत” थीमच्या सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी श्रमाचे संस्कार रुजवून गाव आणि देशाच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादित केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. स्वप्नील दाहात यांनी म्हटले की, हे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबीरातून ग्रामीण संस्कार विद्यार्थ्यांच्या जीवनावर होवून त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी देणारे हे शिबीर ठरणार आहे. उद्घाटक डॉ.सोपानदेव पिसे यांनी उदघाट्नपर भाषणातून म्हटले की, शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये देशाची आणि समाजाची सेवा करण्याचे गुण रुजवून तरुणांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता विकसित करणे हे ध्येय आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस. एस. धोंडगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की, घोरपड गावामध्ये मागील 5 वर्षापासून शिबीर घेत आहोत. विद्यार्थ्यांनी येथील ग्रामीण जीवनातून अनेक गोष्टी शिकविल्या आहेत. आपली थीम ही डिजिटल भारत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्त मोबाईलच्या मागे न लागतां डिजिटल उपवास किमान एक दिवस पाळावा असा महत्वाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.महेश जोगी यांनी केले तर आभार रासायो महिला अधिकारी डॉ.निशिता अंबादे यांनी मानले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने नोंदणी करून शिबिरात सहभाग घेतला आहे. उद्घाटन कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. अझहर अबरार डॉ.तारुण्य मुलतानी, डॉ. प्रशांत धोंगळे, डॉ.दीपक भावसागर, डॉ. तुषार चौधरी, डॉ. रतिराम चौधरी, डॉ.राजेश पराते, डॉ.किशोर ढोले, डॉ. रश्मी जाचक, डॉ. समृद्धी टापरे, डॉ.विकास कामडी, प्रा. सुरज कोंबे, प्रबंधक श्री. स्वप्नील राठोड, तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री.कुणाल कडू, सौ .सीमा पाटील यांनी परिश्रम घेतले.