– ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत दारिद्र रेषेखालील कुटुंबाचे जीवनमान उंचावणे व त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी स्वयं सहायता गटांनी तयार केलेल्या उत्पादीत वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने जिल्हास्तरीय महिला बचत गटांचे वस्तु विक्री व प्रदर्शनी जिल्हा स्तरावर आयोजित करण्याचे नियोजन झालेले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा स्तरीय विक्री प्रदर्शनी स्वयं सहायता गटांनी उत्पादीत केलेल्या मालाचे विक्री व प्रदर्शनी दिनांक ११ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दसरा मैदान, शास्त्री चौक, वरठी रोड भंडारा येथे आयोजित करण्यात येत आहे.








