spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठीत पुन्हा थांबविला बाल विवाह ; आज होणार होता बालविवाह

 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   
पोलिसांच्या सहकार्याने बाल संरक्षण पथकाने थांबविला बालविवाह नवरी हळद लागून तयार होती आणि मंडपात येण्यासाठी निघाले
कामठीत दोन महिन्यात चार बालिका थांबण्याची कारवाई
कामठी – आज दिनांक 25 6 2025 रोजी कामठी येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याबाबतची माहिती कामठी नवीन पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांना मिळाली त्यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांना याबाबतची माहिती दिली जिल्हा महिला बालविकास अधिकारी रंजीत कुरे यांनी तातडीने एक पथक गठीत करून कामठीत पाठवलं आणि पोलिसांच्या सहकार्याने बालविवाहाच्या ठिकाणी धडक देऊन बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करून बंद पत्र लिहून घेण्यात आले व अल्पवयीन मुलीला रेस्क्यू करून पोलिसांच्या सहकार्याने बाल कल्याण समिती समक्ष हजर करून बालगृहात दाखल करण्यात आले.
 कामठीत गेल्या काही महिन्यापासून बालविवाह तक्रारी वाढल्या असून येथील मंगल कार्यालय डेकोरेशन वाले केटरिंग वाले व लग्न लावून देणारे या सर्वांना पोलीस नोटीस बजावणार आहेत व सदर बाबत कामठी विभागात जनजागृती कार्यक्रम करून बालविवाह कशा प्रमाणे रोखता येईल व अल्पवयीन मुलींची सुरक्षा कशी करता येईल याबाबत पोलीस विभाग व महिला व बालविकास विभाग पाऊल उचलणार आहेत सदर कार्यवाही जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, पोलीस निरीक्षक महेश आंधळे, संरक्षण अधिकारी साधना हटवार , दीप्ती मोडघरे रुक्मिणी जंगलवार ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या वैष्णवी बावणे यांनी कार्यवाही केली.
 मुलांच्या आधार कार्ड घेतल्याशिवाय व मुलांची वय निश्चिती झाल्यानुसार मुलगी व मुलगा अल्पवयीन असणार नाही याची खात्री पटल्यानंतरच बुकिंग डेकोरेशन वाल्यांनी हॉल वाल्यांनी, लग्न लावून दिलं नाही देणार यांनी करावी याबाबत पोलीस निरीक्षक महेश आंधळे हे कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत बैठक घेणार आहेत.

Popular Articles