किशोर साहू, मौदा :- निसतखेडा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान तर्फे निसतखेडा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उद्या गुरुवार (ता .19 फेब्रुवारी)ला दुपारी एक वाजता उद्घाटन सोहळा व पालखी मिरवणूक सायंकाळी साडेसहा वाजता भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी जि प सदस्य नंदा गोपाल लोहबरे, कैलास बरबटे खेमराज चाफले, देवेंद्र गोडबोले ,हरिचंद दारोडे ,पांडुरंग दारोडे, नारद दारोडे, फागू दारुडे, राजू महादुले, दिलीप चव्हाण ,प्रभा राहुल बावणे ,रणजीत घिवतोंडे ,आशिष चव्हाण ,प्रकाश महादुले ,बालचंद दारोडे, रजत महादुले, राकेश चव्हाण, राहुल बावणे सह समस्त ग्रामवासी उपस्थित राहणार आहे.








